वेंगुर्ला ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुखपदी निलेश चमणकर यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.२०-: ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच उद्धव ठाकरे पक्ष संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व सचिब माजी खा. विनायक राऊत यांच्या आदेशानुसार
वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुखपदी निलेश जयप्रकाश चमणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली. तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड झाली आहे. निलेश चमणकर हे उभादांडा ग्रामपंचायत सरपंच असून त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातून तसेच युवा वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शहरप्रमुख शैलेश परुळेकर व अन्य पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सहकार्यातून पुन्हा एकदा वेंगुर्ला तालुक्यात संघटना वाढीसाठी क्रियाशील राहणार. तसेच आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकासाठी तयार असल्याचे निलेश चमणकर यांनी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page