सावंतवाडीत गॅस पाईपलाईन सेवेचा शुभारंभ…

नागरिकांना मोठा दिलासा: नगरसेवक अजय गोंदावळे यांच्या प्रभागातून करण्यात आला शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२१-:
सावंतवाडी शहरात अखेर गॅस पाईपलाईन सेवेचा आज अधिकृत शुभारंभ झाला असून त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पाईपलाईन टाकण्याचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. या नव्या सेवेमुळे आता नागरिकांना घरपोच गॅसची सुलभ व सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रभाग क्रमांक ९ येथून सावंतवाडी शहरातील गॅस पाईपलाईन सेवेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक अजय गोंदावळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी या सेवेचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

गॅस पाईपलाईन सेवा सुरू झाल्याने सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न कमी होणार असून वेळ, श्रम व खर्चाची बचत होणार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही सेवा अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page