⚡मालवण ता.२१-:
माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ, मालवण आयोजित भक्तीगीत गायन व धार्मिक कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता माघी श्री गणेश मंदिर रंगमंच येथे होणार आहे.
भक्तीगीतगायन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – या स्पर्धेत गट क्र. १ (बालवाडी) प्रथम – राधा राजशेखर मेस्त्री (रोझरी इंग्लिश स्कूल), द्वितीय वाणिका गुरुनाथ चव्हाण (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा), तृतीय लावण्या दीपक वराडकर (बालविकास प्रकल्प, मालवण), उत्तेजनार्थ तीर्थ रुपेश जुवाटकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ आरोही नितीन पराडकर (काळे आजींची शिशुविहार बालवाडी).
गट क्र. २ (इ. १ ली ते २री) प्रथम क्रमांक आराध्य मदन कांबळे (जि. प. प्राथमिक शाळा, देऊळवाडा), द्वितीय मंत्रा नितीन कोळंबकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), तृतीय ऋतूजा गणेश पवार (रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ आराध्य प्रसाद वालावलकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), उत्तेजनार्थ हर्षदा जगदीश वालावलकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा).
गट क्र. ३ (इ. ३ री ते ४ थी) प्रथम क्रमांक श्लोक नितीन सामंत (मालवण एज्यू प्राथमिक शाळा), द्वितीय त्रिशा रवींद्र मालवणकर (जि. प. प्राथमिक शाळा, देऊळवाडा), तृतीय प्रणेश वारिक (प्राथमिक कन्याशाळा, मालवण), उत्तेजनार्थ संस्कृती शंकर मालाडकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ गिरीजा महेंद्र परुळेकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा).
गट क्र. ४ (इ. ५ वी ते ७ वी) प्रथम क्रमांक गौरी राजन वस्त (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल), द्वितीय शौर्य सुशांत करंगुटकर (रोझरी इंग्लिश स्कूल), तृतीय राजयोग भालचंद्र सामंत (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), उत्तेजनार्थ राही रविराज जाधव (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ ओवी आनंद हिंदळेकर (रोझरी इंग्लिश स्कूल).
धार्मिक कथाकथन स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये गट क्र. १ (बालवाडी) प्रथम क्रमांक समृद्धी कैलास माने (बालविकास प्रकल्प, देऊळवाडा), द्वितीय-समिहन अमोल वझे (काळे आजी शिशुविहार), तृतीय-नचिकेत रश्मीन रोगे (काळे आजी शिशुविहार), उत्तेजनार्थ योहान रोशन सावंत (रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ गार्गी तेजस शिरोडकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा).
गट क्र. २ (इ. १ ली ते २री) प्रथम क्रमांक नांदी चंद्रशेखर कुशे (मालवण एज्यू प्राथमिक शाळा), द्वितीय मंत्रा नितीन कोळंबकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), तृतीय-रणविजय रविराज जाधव (मालवण एज्यू प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ-युवान दशरथ गोवेकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ ओवी युवराज आडकर (जि. प. प्राथमिक शाळा, सर्जेकोट).
गट क्र. ३. (इ. ३ री ते ४ थी) प्रथम क्रमांक तनय चंद्रशेखर कुशे (रोझरी इंग्लिश स्कूल), द्वितीय ऋग्वेदी रामचंद्र चव्हाण (मालवण एज्यू प्राथमिक शाळा), तृतीय अनुज निलेश हिरे (र. दे. विद्यालय, मालवण), उत्तेजनार्थ – त्रिशा रवींद्र मालवणकर (जि. प. प्राथमिक शाळा, देऊळवाडा), उत्तेजनार्थ त्रिशा संतोष खराडे (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा).
गट क्र. ४ (इ. ५ वी ते ७ वी) प्रथम क्रमांक हार्दिक उमेश परुळेकर (रेकोबा माध्यमिक विद्यालय), द्वितीय नचिकेत नंदकिशोर जोशी (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल), तृतीय प्रेरक रवींद्र किसवे (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ स्वरांजली संतोष आंबेरकर (रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ कौस्तुभ गणेश परब (रेकोबा माध्यमिक विद्यालय).
