Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करणे हीच असेल. गरज पडल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. “हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आहे. केवळ आश्वासनं नकोत,…

Read Full News

26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालय…

कृती समितीचा उपोषणाचा इशारासावंतवाडीत बैठक: प्रशासनास दोन दिवसांची मुदत.. ⚡सावंतवाडी, ता.२३-: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात शनिवार 24 जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 26 जानेवारीला नाईलाजाने उपोषणास बसावे; लागेल असा इशारा सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने दिला.कृती समितीच्या शिष्टमंडळास रुग्णालय प्रशासनाने…

Read Full News

रेडी येथील गणपती मंदिरात कोल्हापूर येथील अजयसिंग देसाई व मित्रपरिवार यांच्यामार्फत भाविकांना महाप्रसाद…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या रेडी द्विभूज श्री गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.तसेच तालुक्यातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर, प्रसिद्ध उभादांडा श्री गणपती मंदिर, जुना एस टी स्टॅन्ड दाभोसवाडा गणपती मंदिर, कॅम्प वरदविनायक मंदिर, नवाबाग…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात 1 अर्ज अवैध; 15 जागासाठी 80 उमेदवारी अर्ज दाखल…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यातील एकूण दाखल 99 उमेदवारी अर्जामधून सानिया परशुराम भोसले (रेडी पं. स.मतदारसंघ) यांचा एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरला.निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवारी तहसील कार्यालय सभागृह येथे छाननी प्रक्रिया संपन्न झाली.5 जिल्हा परिषद गट साठी 37 उमेदवारी अर्ज वैध व 10 पंचायत समिती गण…

Read Full News

वरवडे येथे अवैध गुटखा साठा जप्त…

⚡कणकवली ता.२२-:वरवडे – फणसनगर येथे १३ हजार १८० रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात केला आहे. याप्रकरणी शक्ती अय्यर तेवर (५०, वरवडे – फणसनगर ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री १२.३० वा. सुमारास केली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे, हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल स्वप्नील…

Read Full News

गांधी विचारांच्या पुनर्विचारासाठी मालवणात गांधी जागर कार्यक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.२२-:गांधी विचारांचे सखोल आकलन आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर मंथन घडवणारा ‘गांधी जागर २०२६’ हा द्विदिवसीय वैचारिक कार्यक्रम शनिवार, दि. ३१ जानेवारी व रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या गांधी जागरात विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व लेखक सहभागी होणार असून त्यांच्या व्याख्यानातून गांधीजींच्या…

Read Full News

आम्ही नारायण राणे यांना मानणारे आहोत,पण कार्यकर्त्यांची सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये…

धोंडी चिंदरकर: शिवसेना जिल्हाप्रमुखांवर खासदार नारायण राणे कारवाई करणार का..? ⚡मालवण,ता.२२-: आम्ही नारायण राणे यांचे आदेश मानणारे आहोत, पण कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये . जर आमच्या विरोधात एबी फॉर्म दिले जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी माझ्या देहाचे बलिदान देईन, पण कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत भाजप मालवण…

Read Full News

अवैध वाळू वाहतूकप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता…

⚡मालवण ता.२२-: हडी येथे अवैध वाळू वाहतूक तपासणीदरम्यान तत्कालीन तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चौघा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने अॅड. स्वरूप नारायण पई व अॅड. यतिश खानोलकर यांनी प्रभावी काम पाहिले….

Read Full News

पतंजली परिवार सिंधुदुर्ग तर्फे १०८ सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन…

रथसप्तमीचे महत्व लक्षात घेऊन पतंजली परिवार सिंधुदुर्गच्या वतीने १०८ सूर्यनमस्कार घालण्याचे नियोजन.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम मानला जातो .सूर्यनमस्काराने आपले शरीर मजबूत व सुदृढ बनतेच त्याच बरोबर ही उपासना म्हणून केल्यास बुद्धीचे तेज प्रचंड वाढते विचार सात्विक होतात .म्हणून सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पतंजली परिवार सिंधुदुर्ग कडून करण्यात आले आहे….

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 12 उमेदवार बाद…

⚡सावंतवाडी ता.२२-: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तालुक्यामधून एकूण दाखल झालेल्या 161 उमेदवार अर्जापैंकी 12 जणांचे उमेदवारी अर्ज अवैद्य ठरले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी दाखल 59 अर्जापैकी 5 तर पंचायत समितीच्या 102 अर्जांपैकी 7 अर्ज अवैद्य ठरले, याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे यांनी दिली. दरम्यान, 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमकी…

Read Full News

You cannot copy content of this page