⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या रेडी द्विभूज श्री गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.तसेच तालुक्यातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर, प्रसिद्ध उभादांडा श्री गणपती मंदिर, जुना एस टी स्टॅन्ड दाभोसवाडा गणपती मंदिर, कॅम्प वरदविनायक मंदिर, नवाबाग येथे गणेश जयंतीनिमित्त गणपती पूजन, विविध धार्मिक कार्यक्रम, वेतोरे येथील गणपती मंदिर तसेच तालुक्यातील अन्य भागात गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,सत्यविनायक महापूजा, सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. रेडी येथील गणपती मंदिरात कोल्हापूर येथील अजयसिंग देसाई व मित्रपरिवार यांच्यामार्फत भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. श्री देव रामेश्वर मंदिर येथे 21 गणपतीचे पूजन करण्यात आले व गणेशयाग संपन्न झाले. सर्वच ठिकाणी भाविकांनी भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचे दर्शन घेतले.
रेडी येथील गणपती मंदिरात कोल्हापूर येथील अजयसिंग देसाई व मित्रपरिवार यांच्यामार्फत भाविकांना महाप्रसाद…
