वेंगुर्ला तालुक्यात 1 अर्ज अवैध; 15 जागासाठी 80 उमेदवारी अर्ज दाखल…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यातील एकूण दाखल 99 उमेदवारी अर्जामधून सानिया परशुराम भोसले (रेडी पं. स.मतदारसंघ) यांचा एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरला.निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवारी तहसील कार्यालय सभागृह येथे छाननी प्रक्रिया संपन्न झाली.5 जिल्हा परिषद गट साठी 37 उमेदवारी अर्ज वैध व 10 पंचायत समिती गण साठी 61 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
असे एकूण 98 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. छाननी प्रक्रियेनुसार 5 जि. प. गट साठी एकूण 29 अर्ज दाखल झाले आहेत. तर 10 पंचायत समिती गण साठी एकूण 51 अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 15 जागासाठी 80 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. दरम्यान तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद साठी व शिरोडा पंचायत समिती साठी माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब व योगिता सिद्धेश परब यांनी केलेले शक्तिप्रदर्शन द्वारे केलेला अर्ज दाखल बाबत दोन दिवस शहरात चर्चेचा विषय बनला होता. त्यांच्या भूमिकेकडे रेडी वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page