Headlines

Global Maharashtra Breaking News

अच्युत सावंत-भोसले यांचे वडील कुड यशवंत सावंत-भोसले यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०५-: भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री.अच्युत सावंत-भोसले यांचे वडील कुड यशवंत सावंत-भोसले (वय ९२) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे दुःखद निधन झाले. स्व.कुड सावंत-भोसले हे एक प्रगतीशील बागायतदार म्हणून सर्वांना परिचित होते. तसेच ते श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,…

Read Full News

अदृश्य शक्तीला न जुमानता विकासाला मत द्यावे…

महेश सारंग:मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही, काम करत राहिलो.. ⚡सावंतवाडी ता.०४-: ही निवडणूक वेगळ्या दिशेने गेली आहे. भाजप म्हणून आपण लढू अन् जिंकू. त्यामुळे अदृश्य शक्तीला न जुमानता विकासाला मत द्यावे असं आवाहन महेश सरांग यांनी केल. मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही. आज नारायण राणेंच्या…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एकच शक्ती ती म्हणजे नारायण राणे नावाचीच…

मंत्री नितेश राणे:अपक्ष उमेदवार निवडून आला तर निधी कुठून आणणार..?, त्यामुळे महेश सारंग यांना निवडून द्या.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एकच शक्ती आहे. ती म्हणजे नारायण राणे नावाची शक्ती इतर कुठली शक्ती इथे नाही असं विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं. तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिवसरात्र पक्षवाढीसाठी मेहनत करत आहेत. मात्र, त्यांच्या नावानं काही…

Read Full News

पैशान नव्हे तर प्रेमानं माणस जोडता आली याचा मला सार्थ अभिमान…

विक्रांत सावंत: राजकारणाकडे मी पैसा कमावण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही… ⚡सावंतवाडी ता.०४-:“आमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणेकार्यरत आहेत. त्या वारशाला पुढे नेण्याचे काम मी करत असून, राजकारणाकडे मी पैसा कमावण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत यांनी आज केले. ते पुढे म्हणाले की, “मी…

Read Full News

कट्टा येथील उडान महोत्सवात स. का. पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश…

⚡मालवण ता.०४-:डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे मुंबई विद्यापीठ यांच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे आयोजित उडान महोत्सव २०२५-२६ मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. या उडान महोत्सवातील पथनाट्य स्पर्धेत ‘ई – कचरा’ या विषयावर स. का. पाटील…

Read Full News

घरोघरी प्रचारातून विक्रांत सावंत व सचिन बिर्जेंना जनतेचा भरभरून पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.०४-: माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात सोनुर्ली येथे जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत व पंचायत समिती सदस्य सचिन बिर्जे यांनी झंझावाती प्रचार केला. प्रत्येक घरोघरी प्रचारावर भर देतांना दोघांनाही लोकाचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. माझगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून शिंदे शिवसेना भाजपा महायुतीमधून विक्रांत सावंत…

Read Full News

दक्षिण कोकणची काशी सज्ज…

१५ फेब्रुवारीपासून श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचा दिमाखदार सोहळा:प्रशासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्टची तयारी युद्धपातळीवर.. ⚡​देवगड ता.०४-:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची वार्षिक यात्रा यंदा १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. यंदा…

Read Full News

शिरगांव आठवडा बाजारात प्रशासनामार्फत मतदान जनजागृती…

⚡देवगड ता.०४-: शिरगांव येथील आठवडा बाजाराच्या ठिकाणी शेठ .म. ग . हायस्कुल देवगडच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करत मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यात आली .या कार्यक्रमांना तहसिलदार देवगड रमेश पवार यांनी प्रोत्साहन देत विदयार्थ्यांचे कौंतुक केले .या पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा हक्क, त्याचे महत्त्व, निर्भय व निष्पक्ष मतदान…

Read Full News

आडेली पंचायत समिती मतदारसंघात नित्यानंद शेणई यांचा घरोघरी प्रचार…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील आडेली पंचायत समिती मतदार संघाचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नित्यानंद बाळकृष्ण शेणई यांनी आडेली गावात जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. तसेच आडेली जि. प. चे उमेदवार विजय नाईक व वायंगणी पं. स. चे उमेदवार माडकर यांच्या प्रचारासही मोठा प्रतिसाद लाभत आहे. यावेळी आडेली खुटवळवाडी येथे उमेदवार नित्यानंद…

Read Full News

माळगाव बागायत परिसरात बीएसएनएल नेटवर्क विस्कळीत; ग्रामस्थांची गैरसोय…

⚡मालवण ता.०४-:मालवण तालुक्यातील माळगावबागायत परिसरात गेले दोन महिने बीएसएनएल ची नेटवर्क सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या परिसरात इतर कोणतेही नेटवर्क नसल्यामुळे येथील नागरिकांना बीएसएनएल हाच एकमेव पर्याय आहे. परंतु या भागात असलेल्या बीएसएनएल टॉवरचा ग्रामस्थाना कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. बीएसएनएल सेवा वारंवार खंडित होत असल्याने बीएसएनएल ग्राहकांची विविध कामांमध्ये मोठी गैरसोय होत…

Read Full News

You cannot copy content of this page