चित्रकला व शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद …
⚡बांदा ता.११-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा नं. १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला तसेच शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…
