⚡बांदा ता.११-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा नं. १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला तसेच शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उदघाटन उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.
रंगभरण स्पर्धा विविध शालेय तसेच खुल्या गटात संपन्न झाली. राजाराम धारगळकर म्हणाले की, शिवविचार घराघरात पोहचविण्याचे चांगले कार्य स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे. बांदा शहरात मुलांसाठी विविध स्पर्धा राबवून त्यांना शिवकार्यात सामावून घेण्याचे शिवधनुष्य प्रतिष्ठानने हाती घेतले आहे हे कौतुकास्पद आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ठ चित्रांचे रेखाटन केले. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
रंगभरण
अंगणवाडी ते पहिली गट (प्रथम पाच क्रमांक)- रुद्रानी यशवंत पंडित (अंगणवाडी बांदा), धनश्री संजय देसाई (केंद्र शाळा बांदा नं 1), रामिका तुषार गोरड (अंगणवाडी मोरगाव), नितेश सीताराम धुरी (केंद्र शाळा बांदा नं 1), सौम्या कृष्णा शेर्लेकर (दिव्य ज्योती स्कुल, बांदा).
दुसरी ते चौथी गट
प्रार्थना प्रणय नाईक (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव), स्वप्नील संजय गावडे (घारपी), मिताली नामदेव साळगावकर (व्ही एन नाबर हायस्कूल मडूरा), वेदश्री कल्याणकर (दिव्य ज्योती बांदा), वेदांत जीवबा वीर (बांदा नं 1)
पाचवी ते सातवी गट
देवांशू गजानन चितारी (कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी), श्रुष्टि महेंद्र परब (दिव्य ज्योती बांदा), ग्री्षा समीर परब (दिव्य ज्योती बांदा), गार्गी दत्तगुरु भोगन (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी), अयान आत्माराम करपे.
आठवी ते दहावी गट
वेणू अजित सावंत (कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), जीन्येषा कमलेश भैरे (नेमळे माध्यमिक विद्यालय), अथर्व संजय शेडगे, दुर्वा संतोष दाभोलकर (कळसुलकर हायस्कूल), गौरी धैर्यशील शिर्के.
अकरावी ते खुला गट
राजेश विनायक आजगांवकर, केदार सखाराम टेमकर, सेजल संजय गावडे
(भोसले कॉलेज सावंतवाडी), तन्वी सूर्यकांत कुडव, सूर्यकांत गजानन चव्हाण.
शिवगीत गायन स्पर्धा
पाचवी ते सातवी गट – चिन्मयी नीलेश मेस्त्री (इन्सुली नंबर 4), सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (बांदा नं 1), आर्या बाळा ठाकर (बांदा नं 1).
आठवी ते दहावी गट
वृक्षदा रोहिदास देसाई -कळंगुटकर (दिव्य ज्योती बांदा), नैतिक नीलेश मोरजकर (खेमराज हायस्कूल बांदा)
खुला गट
श्रुती शिवाजी पोपकर (इन्सुली), प्राची दळवी.
दोन्ही स्पर्धाचे परीक्षक यामेश खवणेकर, महेंद्र मांजरेकर यांनी केले. सर्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण 19 रोजी बांदा केंद्रशाळेत होणाऱ्या शिवजयंती मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे.
यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर,संकेत वेंगुर्लेकर, केदार कणबर्गी, शुभम बांदेकर, जे. डी. पाटील, भूषण सावंत, नारायण बांदेकर, समीर परब, अनुप बांदेकर, कांता हळदणकर, तनिष मेस्त्री, प्रथमेश राणे,अक्षय मयेकर,रीना मोरजकर, वेदिका गावडे आदिसह रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोहन कुबडे, मयूर मसुरकर, मनीषा खणगावकर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिक्षक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे डी पाटील यांनी केले.
फोटो :-
बांदा येथे आयोजित चित्रकला स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना उपसरपंच आबा धारगळकर. सोबत इतर.
