कणकवली पोलीस ठाण्याच्या सुशोभीकरणाचा ‘बाहेरून चकचकाट, आतून खडखडाट’
स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष.. ⚡कणकवली ता.१३-:जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कणकवली शहरात दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, याच शहरातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या कणकवली पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीला बाहेरून रंगरंगोटी करून चकाकी देण्यात आली असली, तरी अंतर्गत मूलभूत सुविधांचा मात्र पुरता बोजवारा उडाला असून, अस्वच्छतेमुळे नागरिकांना मनस्ताप…
