Headlines

Global Maharashtra Breaking News

महापुरुष महाउत्सवाला संदेश उर्फ गोट्या सावंत यांची भेट..

बाजारपेठेतील मंडळाच्या कार्याचे कौतुक…! ⚡कणकवली ता.२३-: शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला सायंकाळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री देव गणपती, साईनाथ महाराज तसेच श्री देव महापुरुष यांचे दर्शन घेतले.महापुरुष महाउत्सवाच्या निमित्ताने शहरात उभारण्यात…

Read Full News

कलमठ ग्रामपंचायतीतर्फे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान…

⚡कणकवली ता.२३-: कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली कलमठ बाजारपेठ शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बोलताना संदीप मेस्त्री म्हणाले की, आपल्या कलमठ गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या…

Read Full News

भर दुपारी बंद घर फोडले; बांदा काळसेवाडीत खळबळ…

⚡बांदा ता.२३-: बांदा येथील काळसेवाडी परिसरात भर दुपारी बंद घर फोडल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवा उद्योजक सिद्धेश शिरोडकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना आज घडली. शिरोडकर यांचे घर हे हमरस्त्याला लागून आहे.आज आठवडा बाजाराचा दिवस असतानाही चोरट्यांनी ही धाडसी कारवाई केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सिद्धेश शिरोडकर यांचे बांदा…

Read Full News

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला आजगावात उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती उमेद अभियानांतर्गत एकता प्रभागसंघ मळेवाड ,PRI – CBO Convergence Project अंतर्गत शिवप्रेमी बालसभा स्थापन झाली या अंतर्गत मैत्री ग्रामसंघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विलासानंद मठकर , मदन मुरकर, सुनील गोवेकर, बी आर पी प्राची…

Read Full News

मळेवाड पंचक्रोशीत अवकाळी पाऊस…

आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता :शेतकरी बागायतदार चिंतेत.. ⚡सावंतवाडी ता.२३-: आज सकाळी मळेवाड पंचक्रोशित अवकाळी पावसाने हजेरी लावली.गेले दोन तीन दिवस वातावरणातील तापमान वाढले होते.त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते.मात्र ऐन काजू ,आंब्याच्या हंगामात या अवकाळी पावसाच्या आगमनाने येथील शेतकरी ,बागायतदार मात्र धास्तावला आहे.आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यातच सर्वत्र धुकं पसरलं होतं.त्यामुळे पाऊस…

Read Full News

डी.जी.बांदेकर आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळा उत्साहात…

⚡सावंतवाडी,ता.२३-: डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ६ वर्षांवरील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून चित्रकला, क्राफ्ट व विविध सर्जनशील उपक्रमांमधून आपली कल्पकता व्यक्त केली. या उपक्रमासाठी बी. एस. बांदेकर फाईन आर्ट (उपयोजित कला) महाविद्यालय, सावंतवाडी तसेच डी.जी.बांदेकर ट्रस्ट, फाउंडेशन कोर्स चे…

Read Full News

‘आम्ही साहित्यप्रेमी ‘च्या वर्षपुर्तीनिमित्त ओरोस येथे 28 फेब्रुवारीला काव्योत्सव…

निलेश गावकर, कल्पना मलये, श्रेयश शिंदे विशेष निमंत्रित.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२३-: आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. निलेश गावकर (साळशी), कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे (कणकवली) निमंत्रित कवी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा…

Read Full News

स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत कनकनगर ते केटी बंधारा परिसर स्वच्छ…

⚡कणकवली ता.२३-: संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत या उपक्रमाअंतर्गत शहरातील कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत फाउंडेशनच्या सुमारे ८० सेवादलांनी सक्रिय सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. केटी बंधाऱ्यावरील नदीपात्रात साचलेला कचराही बाहेर काढण्यात आला. कनकनगर…

Read Full News

संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त सावंतवाडीत महास्वच्छता अभियानाचा उत्साहात समारोप…

⚡सावंतवाडी ता.२३-: स्वच्छतेमुळे आरोग्य सुदृढ राहते आणि समाज निरोगी बनतो, असा संदेश देत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित महास्वच्छता अभियानाचा समारोप उत्साहात पार पडला. प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, “कचरा करू नका, घराभोवती स्वच्छता ठेवा; शहर आपोआप स्वच्छ राहील,” असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, स्वच्छता…

Read Full News

प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली मिशन क्लीन सावंतवाडी अंतर्गत महा स्वच्छता मोहीम…

⚡सावंतवाडी ता.२२-: मिशन क्लीन सावंतवाडी अंतर्गत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांची व्यापक महा स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे सावंतवाडी शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करत विविध ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली.या अभियानात सरकारी व खासगी रुग्णालये, शाळा, बसस्थानक, सरकारी कार्यालये, प्रमुख रस्ते व त्यालगतचे परिसर स्वच्छ करण्यात आले. कचरा…

Read Full News

You cannot copy content of this page