Headlines

Global Maharashtra Breaking News

दहावी, बारावीतील खेळाडूंच्या ग्रेस गुणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू : आम.जयंत आसगावकर

क्रीडा शिक्षकांच्या ऑनलाईन सभेत प्रतिपादन *💫कणकवली दि.१३:-:* दहावी व बारावी बोर्ड परीक्षेला मिळणाऱ्या ग्रेस गुणापासून एकही खेळाडू वंचित राहणार नाही यासाठी योग्य तो पाठपुरावा करणार असून शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन यासंदर्भात लवकर निर्णय घेण्याची विनंतीही केली आहे अशी माहिती पुणे विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आम.जयंत आसगावकर यांनी दिली.ते क्रीडा शिक्षकांच्या आयोजित केलेल्या आॅनलाईन…

Read Full News

सातोसे मार्गे सातार्डा वस्तीची एसटी बस सुरू…

तळवणेकर यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.१३-:* सोमवार पासून सातोसे मार्गे सातार्डा वस्तीची एसटी बस चालू करण्यात आली आहे. याबाबत आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी मंगेश तळवणेकर यांना लेखी पत्र दिले आहे. ही बस चालू करण्यासंदर्भात मंगेश तळवणेकर यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन मागणी केली होती, ही बस चालू झाल्याने त्यांच्या मागणीला यश आले आहे. या पत्रात…

Read Full News

शिल्पग्राम परिसरातील जंगलाला भीषण आग

*आग विजवण्यासाठी नग्रपलिकेच्या अग्निशमन बंबा कडून शर्थीचे प्रयत्न सुरू *💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडीतील शिल्पग्राम परिसरात असणाऱ्या जंगलाला आज भर दुपारी आग लागली असून, या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच याबाबतची माहिती प्राप्त होताच नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात त्या…

Read Full News

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन ६३ व्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? याप्रकरणी दिनांक १० नोव्हेंबर पासून ते १४ डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करुन ही जिल्हा परिषद प्रशासन कुंभकर्ण अवतारात गेल्यामुळे १५ डिसेंबर पासून के मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी यांच्या गेटवर घंटानाद आंदोलन सुरू आहे. आजचा आंदोलनाचा ६३ वा…

Read Full News

तेली समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने प. पू. संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी

*💫सावंतवाडी दि.१३-:* तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडीच्यावतीने मंगळवारी तालुक्यातील तेली बांधवांनी प. पू. संताजी जगनाडे महाराजांची ३२१ वी पुण्यतिथी प. पू. संताजी नगर न्यु खासकीलवाडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी केली. सकाळी ६.३० वाजता प. पू. संताजी जगनाडे मूर्तीचे आगमन साध्या पद्धतीने करण्यात आले. मूर्ती विराजमान झाल्यावर बा्रम्हणांच्या साक्षीने संस्थचे उपाध्यक्ष शाम निवेलकर, शुभदा निवेलकर…

Read Full News

भारतीय संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी म्हणजे स्वामी विवेकानंद : प्रा. अरुण मर्गज

*कुडाळ येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी *💫कुडाळ दि.१३-:* भारतीय संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी म्हणजे स्वामी विवेकानंद होय. युवकांमधील तेजस्वी सामर्थ्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय आणि मुलांना संस्कारित करून त्यांच्यामध्ये स्वराज्यस्थापनेची दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करणारी समर्थ माता जिजाऊ ही भारतवर्षाला मिळालेली मौलिक देणगी होय असे प्रतिपादन प्रा. अरुण मर्गज यांनी कुडाळ…

Read Full News

विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन्ही डंपरवर कारवाई करणार

तहसीलदार रमेश पवार यांची माहिती *💫कणकवली दि.१३-:* विनापरवाना वाहतूक करताना रत्नागिरी जिल्ह्यातील एका डंपरसह कणकवली तालुक्यातीलही एक डंपर खनिकर्म विभागाने पकडला होता. या दोन्ही डंपरवर वाळूसह वाहन अशी दंडात्मक कारवाई करणार असल्याचे कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी सांगितले. डंपरमालकांकडून प्रतिज्ञापत्रही घेतले जाणार आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हि करवाई हुंबरठ येथे करण्यात आली. पकडलेल्या…

Read Full News

बांदा संकेश्र्वर महामार्ग शहरातून जाईल असे आश्वासन देत केसरकर करत आहेत पुन्हा एकदा धूळफेक

विकासकामांसाठी निधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला – अमित परब *💫सावंतवाडी दि.१३-:* आमदार दिपक केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी आणलेला निधी हा आकाशातून आला नाही. तर तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळाला आहे. केसरकर यांनी हा निधी आपल्या घरातून किंवा आमदार फंडातून दिला नाही. अशी बोचरी टीका करत भाजप तालुका खजिनदार तथा चराठा…

Read Full News

आंबोली कबुलातदार प्रश्न राणेंना तरी समजला का?

आमदार दिपक केसरकर यांची राणेंवर टिका* *💫सावंतवाडी दि.१३-:* आंबोलीतील कबुलातदार प्रश्न नारायण राणे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात चिघळला असा खुलासा आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राणे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्याचा फायदा कोकणला होणे गरजेचे होते परंतु त्यांनी अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले त्यामुळेच हा प्रश्न सोडायला आपणास वेळ लागला असे केसरकर यांनी…

Read Full News

त्या उद्घाटन झालेल्या विकास कामांसाठी निधी मीच दिला

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.१३-:* सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, गावागावात कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह निर्माण झाला असून, गावागावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. परंतु काही विरोधक हे बदनामी करून आपण विकास कामासाठी पैसे आणले अश्या आविर्भावात वागत असल्याचा आरोप आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार…

Read Full News

You cannot copy content of this page