विकासकामांसाठी निधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला – अमित परब
*💫सावंतवाडी दि.१३-:* आमदार दिपक केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी आणलेला निधी हा आकाशातून आला नाही. तर तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळाला आहे. केसरकर यांनी हा निधी आपल्या घरातून किंवा आमदार फंडातून दिला नाही. अशी बोचरी टीका करत भाजप तालुका खजिनदार तथा चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. कोरोना काळात मतदार संघातून मिस्टर इंडिया सारखे गायब झालेल्या केसरकरांनी जनतेला वाऱ्यावर सोडत आजारपणाचे नाटक करत मुंबईत लपून बसले होते. तालुक्यातील शाळेतील मुले आमदार दिपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या सेट टॉप बॉक्स ची वाट पाहत असून, युवक रोजगाराच्या दृष्टीने चष्मा कारखान्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचा चिमटा अमित परब यांनी आमदार केसरकर याना काढला आहे. आमदार केसरकर यांचेच पदाधिकारी शहरातील फळ विक्रेत्यांकडून हफ्ते घेत आहेत. हे संपूर्ण सावंतवाडीतील जनतेला ठाऊक असून, तुमच्याच काळात शहरात अनधिकृत स्टॉल उभारले गेले असून, ते कोणाचे आहेत हेही माहित असल्याचा आरोप अमित परब यांनी आमदार केसरकर यांच्यावर केला आहे. तसेच मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडीतून जाईल असे सांगून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली होती तशीच धूळ फेक आता बांदा संकेश्वर महामार्गावरून आमदार दिपक केसरकर करत असल्याचा आरोप पण त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
