आमदार दिपक केसरकर यांची राणेंवर टिका*
*💫सावंतवाडी दि.१३-:* आंबोलीतील कबुलातदार प्रश्न नारायण राणे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात चिघळला असा खुलासा आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राणे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्याचा फायदा कोकणला होणे गरजेचे होते परंतु त्यांनी अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले त्यामुळेच हा प्रश्न सोडायला आपणास वेळ लागला असे केसरकर यांनी सांगितले आहे. जसे आमदार अब्दुल सत्तार याना हा प्रश्न समजला नाही तसाच राणे ना देखील हा प्रश्न समजला नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
