विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन्ही डंपरवर कारवाई करणार

तहसीलदार रमेश पवार यांची माहिती

*💫कणकवली दि.१३-:* विनापरवाना वाहतूक करताना रत्नागिरी जिल्ह्यातील एका डंपरसह कणकवली तालुक्यातीलही एक डंपर खनिकर्म विभागाने पकडला होता. या दोन्ही डंपरवर वाळूसह वाहन अशी दंडात्मक कारवाई करणार असल्याचे कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी सांगितले. डंपरमालकांकडून प्रतिज्ञापत्रही घेतले जाणार आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हि करवाई हुंबरठ येथे करण्यात आली. पकडलेल्या डंपरपैकी स्थानिक असलेल्या डंपरचालकाने वाळू हुंबरठ येथेच ओतली. तर रत्नागिरी जिल्ह्यातील वाळू भरलेला डंपर कणकवली तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आला. जरी स्थानिक डंपर चालकाने वाळू ओतून टाकली असली तरीही प्रतिज्ञापत्र आणि वाळू आणि वाहनाचा दंड भरल्याशिवाय सदर डंपर सोडणार नसल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. अद्याप वाळू चा प्रतिब्रास निश्चित न झाल्यामुळे वाळूपट्टे लिलाव झालेला नाही. तरीही अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. एकीकडे कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कर्जाऊ डंपर घेतलेल्या डंपरमालकांचे बँकांचे हफ्ते भरताना नाकीनऊ आले आहेत. गृहबांधणी आणि सिव्हिल वर्क सुरू झाल्यामुळे डंपरमालकांनी वाळूवाहतुक सुरू केली आहे. मात्र विनापरवाना वाळू वाहतूक सापडल्यास महसूल विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाळू लिलाव करावा अशी मागणी डंपर मालक करत आहेत.

You cannot copy content of this page