दहावी, बारावीतील खेळाडूंच्या ग्रेस गुणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू : आम.जयंत आसगावकर

क्रीडा शिक्षकांच्या ऑनलाईन सभेत प्रतिपादन

*💫कणकवली दि.१३:-:* दहावी व बारावी बोर्ड परीक्षेला मिळणाऱ्या ग्रेस गुणापासून एकही खेळाडू वंचित राहणार नाही यासाठी योग्य तो पाठपुरावा करणार असून शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन यासंदर्भात लवकर निर्णय घेण्याची विनंतीही केली आहे अशी माहिती पुणे विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आम.जयंत आसगावकर यांनी दिली.ते क्रीडा शिक्षकांच्या आयोजित केलेल्या आॅनलाईन बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्यध्यक्ष राजेंद्र कोतकर, बी.डी. जाधव(नांदेड), मच्छिंद्र ओहळ(पुणे हववेली), दत्तात्रय मारकड(सिंधुदुर्ग), गोवर्धन राठोड(बीड), रोहिदास बडाळे,संदीप इंगवले,संदीप जाधव,कपील ठाकुर(वर्धा),अनिल चांद, व अन्य क्रीडा शिक्षक महासंघाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. या आॅनलाईन सभेत राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. शासनाने लवकरात लवकर सोडवावेत तसेच कोरोना पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा न झाल्याने दहावी-बारावी ग्रेस गुणांचा तिढा शासनाने सोडवून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी यानिमित्ताने केली. या सभेत पुणे क्रीडा अधिकारी श्री.स्वामी, बी.डी.जाधव,दत्तात्रय मारकड व अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यासभेचे सूत्रसंचालन मच्छिंद्र ओहळ यांनी तर आभार रोहिदास बडाळे यांनी मानले.

You cannot copy content of this page