बांदा साईमंदीरात साईलीला दिनदर्शिका प्रकाशन साेहळा संपन्न…

*💫बांदा दि.१३-:* बांदा आळवाडा येथील साईमंदीरात मकर संक्रातीचे औचित्य साधुन श्री साईबाबा भक्त सेवा मंडऴ आयाेजीत साईलीला दिनदर्शिका २०२१ चा प्रकाशन साेहऴा साै.श्वेता काेरगावकर बांदा जिल्हा परीषद सदस्या, बांदा ग्रामंचायतचे विद्यमान सरपंच अक्रम खान, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी या मानवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. मान्यंवराचे स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्रनाथ मालवणकर यानी केले. या कार्यक्रमास प्रशांत पांगम, सुशांत पागम,श्वानेश्वर केसरकर गिरीष महाजन, सतिश नाटेकर, खजिनदार राजेश कारेकर, विश्वस्त प्रितम हरमलकर, साईराज साऴंगावकर, बंड्या हरमलकर, प्रितेश केसरकर, विजय कासार,मनाेज कल्याणकर, नरेश आकेरकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरूनाथ सावंत, बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर, साै राजश्री तेंडले,साै. दर्शना केसरकर उपस्थित हाेते. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले, आभार राजेश कारेकर यानी मानले.

You cannot copy content of this page