जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन ६३ व्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? याप्रकरणी दिनांक १० नोव्हेंबर पासून ते १४ डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करुन ही जिल्हा परिषद प्रशासन कुंभकर्ण अवतारात गेल्यामुळे १५ डिसेंबर पासून के मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी यांच्या गेटवर घंटानाद आंदोलन सुरू आहे. आजचा आंदोलनाचा ६३ वा दिवस उजाडला आहे. असे हे आंदोलन चालू असताना त्यांनी ही महाभारतातील कुंतीचा अवतार धारण केला की काय ? औटघटकेचे राजेंना डॉ हेमंत वसेकर यांनीच २० नोव्हेंबर २० रोजी पदोन्नती समितीच्या बैठक घेण्याची परवानगी दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. जर मुख्य कार्यकारी अधिकारी च खोटे बोलत असतील तर औटघटकेचे राजेंनी एवढा पराक्रम केला च नसता. त्यांनी आपलीच लाल असल्याचे दैनिक सकाळ, तरुण भारत चे पत्रकारांशी हात मिळवणी करण्याचा‌ प्रयत्नही केल्याचे सिद्ध झाले ते असे की, शासन निर्णयानुसार प्रशासनाच्या विरोधात किंवा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात वृत्त पत्रकातून बातमी प्रसिद्ध झाली तर त्या बातमीचा खुलासा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून तात्काळ वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना या औटघटकेचे राजेंनी डॉ हेमंत वसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि के मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी यांना न विचारताच राजेंद्र पराडकर,मदन भिसे यांनी पेपर मध्ये बातमी देऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली १२ वर्षे शासनाने दिलेल्या आकृतिबंध बाहेरील नियमबाह्य पद्धतीने पदभरतीची माहिती शासनाला पाठवलीच नाही असे जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिलेल्या माहिती अधिकारात सिद्ध झाले. दिनांक १५ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांनी ओरोस पोलिस प्रभारी यांच्या मार्गदर्शनानुसार मी नवबौद्ध असल्यामुळेच वाद्ये वाजवण्याची परवानगी दिली नाही तेच अमोल फाटक, प्रभारी अधिकारी शिक्षक संघटनेला, राजकीय पक्षांच्या मोर्चा मध्ये स्पीकर, माईक साठी परवानगी देतात म्हणजेच मी मागासवर्गिय समजूनच वाद्य वाजविण्याची परवानगी देत नाहीत म्हणजेच तेही अधिकारी जातीयवादी असल्याचे सिद्ध झाले म्हणायचे का ? नसेल तर त्यांनी मला या कुंभकर्ण अवतारातील अधिका-यांना जागे करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केली.

You cannot copy content of this page