*💫सावंतवाडी दि.१३-:* तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडीच्यावतीने मंगळवारी तालुक्यातील तेली बांधवांनी प. पू. संताजी जगनाडे महाराजांची ३२१ वी पुण्यतिथी प. पू. संताजी नगर न्यु खासकीलवाडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी केली. सकाळी ६.३० वाजता प. पू. संताजी जगनाडे मूर्तीचे आगमन साध्या पद्धतीने करण्यात आले. मूर्ती विराजमान झाल्यावर बा्रम्हणांच्या साक्षीने संस्थचे उपाध्यक्ष शाम निवेलकर, शुभदा निवेलकर दाम्पत्याने अभिषेक करून वेदोक्त पूजन केले. त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद भंडारा कार्यक्रम पार पडला. रात्री पाटेश्वर प्रासादिक भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश तेली, उपाध्यक्ष शाम निवेलकर, खजिनदार दीपा तेली, अध्यक्ष जयराम आजगावकर, दिनकर तेली, हरिश्चंद्र तेली, विनायक तेली, मनोज बांदेकर तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.
तेली समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने प. पू. संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी
