Headlines

Global Maharashtra Breaking News

“साहित्यिकांचे चरित्र लिहिण्याचे प्रयत्न करा”- प्रकाशक प्रमोद कोनकर….

*💫मालवण दि.०८-:* लेखकांनी सिंधुदुर्गातील साहित्यिकांवर सुंदर लेख लिहिले आहेतच. आता त्यांचे चरीत्र लिहिण्याचा संकल्प करा. लेखनातून साहित्य चळवळ समृद्ध करावी असे प्रतिपादन श्री. प्रमोद कोनकर यांनी येथे बोलताना केले को. म. सा. प. मालवण शाखेने नुकतेच प्रकाशित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकातील सोळा लेखकांचा तसेच या प्रकाशनासाठी काम केलेल्या सदस्यांचा ‘अक्षरगौरव सोहळा’ को. म. सा. प….

Read Full News

देवगड पंचायत समिती उपसभापतीपदी रविंद्र तिर्लाेटकर बिनविरोध…

*💫देवगड दि.०८-:* देवगड  पंचायत समितीच्या उपसभापतीपदी रविंद्र तिर्लाेटकर यांची पक्ष धाेरणानुसार निवड  झाली आहे. देवगड पंचायत समिती उपसभापतीपदाची निवडणुक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा तहसिलदार मारूती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत पार पडली. या पदासाठी रविंद्र तिर्लाेटकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला हाेता. यामुळे त्यांची उपसभापतीपदासाठी बिनविराेध निवड झाली. रिंवद्र तिर्लाेटकर…

Read Full News

इ स्टोअर इंडिया” या सुपर मार्केटचे दिमाखात उद्घाटन..

तालुक्यातील ग्राहकांना मिळणार दोडामार्गात स्वस्त वस्तू *💫दोडामार्ग / सुमित दळवी* संपूर्ण महाराष्ट्रात 250 पेक्षा जास्त शाखा असलेल्या “इ स्टोअर इंडिया” या सुपर मार्केटची सिंधुदुर्गातील १० वी शाखा दोडामार्ग येथील दळवी कॉम्प्लेक्स मध्ये सुरू झाली, याचा छानदार उदघाटन सोहळा अनिल जाधव, नेशनल प्रमोटर, शैलेश पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुरेश दळवी जिल्हा बॅंक उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली…

Read Full News

*विनयभंग केल्याप्रकरणी माजगाव येथील युवकांवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

सावंतवाडी : सावंतवाडी : तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तालुक्यातील येथील भुषण दत्ताराम देसाई (वय ३५) याच्यावर भादवी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दरवाजाने घरात घुसून पाठीमागून पकडून बेडवर ढकलले अशी तक्रारदार महिलेनं सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली असून, तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ….

*💫वैभववाडी दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ 8 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांच्या उपस्थित करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण…

Read Full News

माणगाव शिवसेना विभाग संघटकपदी कौशल जोशी यांची नियुक्ती…

आ.वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र *💫कुडाळ दि.०८-:* शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल दत्ताराम जोशी यांची माणगाव शिवसेना विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली विजय भवन येथे नियुक्ती पत्र देऊन पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….

Read Full News

वाभवे – वैभववाडी न .पं. च्या ७ नगरसेवकांचा भाजप पक्ष सदस्यत्वचा राजीनामा…

*💫वैभववाडी दि.०८-:* वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ७ विदयमान नगरसेवकांसह तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा भाजपा तालुकाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.हे सर्व नगरसेवक हातात शिवबंधन बांधणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्याला तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनीही दुजोरा…

Read Full News

‘त्या’ धोरणाबाबत नाना पटोले यांचे मालवणचे युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी मानले आभार…

*💫मालवण दि.०८-:* महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोळीवाड्यातील जमिनी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले. त्याबद्दल नाना पटोले यांची भेट घेऊन मालवणचे युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत. मच्छिमार राहत असलेली गावे कोळीवाडे मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी महाराष्ट्रातील कोळीवाड्यातील जमिनींचे सध्या सीमांकन सुरू आहे….

Read Full News

*_’कोरे’च्या निष्काळजीपणामुळे मडुऱ्यात आंबा बागायतीस आग…

पोलीस पाटलांसमोर शेतकऱ्यांचा आरोप;अधिकारी मात्र निरुत्तर *💫बांदा दि.०८-:* मडुरा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या पॅनेल वेल्डिंगच्या कामाची ठिणगी आंबा बागायतीत पडल्याने मडुरा काजरमळी भागातील सुमारे दहा एकरातील काजू, आंबा, सागवान, आईन, किनळ, जांभूळ, आकाशी आदी झाडे जळून शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली…

Read Full News

मालवण तालुक्यात कोरोना बळींची संख्या पोहोचली २१ वर…

कुंभारमाठ येथील मृत इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह *💫मालवण दि.०८-:* मालवण ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी कुंभारमाठ येथील ४५ वर्षीय इसमाला उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीचा काही वेळातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दरम्यान त्या रुग्णाची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली असता तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मालवण तालुक्यात कोरोना बळींची संख्या २१ वर पोहचली…

Read Full News

You cannot copy content of this page