*_’कोरे’च्या निष्काळजीपणामुळे मडुऱ्यात आंबा बागायतीस आग…

पोलीस पाटलांसमोर शेतकऱ्यांचा आरोप;अधिकारी मात्र निरुत्तर

*💫बांदा दि.०८-:* मडुरा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या पॅनेल वेल्डिंगच्या कामाची ठिणगी आंबा बागायतीत पडल्याने मडुरा काजरमळी भागातील सुमारे दहा एकरातील काजू, आंबा, सागवान, आईन, किनळ, जांभूळ, आकाशी आदी झाडे जळून शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली परंतु दुपारची वेळ असल्यामुळे त्यांचे हात तोकडे पडले. घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

You cannot copy content of this page