*💫मालवण दि.०८-:* महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोळीवाड्यातील जमिनी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले. त्याबद्दल नाना पटोले यांची भेट घेऊन मालवणचे युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत. मच्छिमार राहत असलेली गावे कोळीवाडे मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी महाराष्ट्रातील कोळीवाड्यातील जमिनींचे सध्या सीमांकन सुरू आहे. राज्य शासनाने या जमिनींसंदर्भात धोरण निश्चित करून या निवासी आणि व्यवसायासाठीच्या जमिनी मच्छिमारांच्या नावावर कराव्यात आणि कोळी, गाबित या समाजाला न्याय द्यावा, असे निर्देश दिले असल्याने तसेच सध्या भूमी अभिलेख विभागामार्फत मच्छिमार गावांची सीमांकने सुरू आहेत, जे मूळ कोळी कोकणात गाबित आणि आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कोळीवाड्याच्या जमिनीसंदर्भातील समस्यांवर न्याय मिळणे गरजेचे होते. केवळ कोळीवाडा परिसरातील सीमांकन करून न थांबता, संबंधित पट्टा मूळ रहिवाशांच्या नावावर देण्यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाने सर्वंकष धोरण निश्चित करून कार्यवाही करावी तसेच मुंबईबरोबर मूळ कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या ७२० किमीच्या सागरी किनारपट्यांमध्ये स्थानिक मच्छिमारीचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय करत आहेत. मुंबईतील कोळीवाडयांप्रमाणे, कोकणातील जमिनीच्या सीमांकनाबाबत कोणतीही भीती या समाजाने बाळगू नये. मूळ निवासींना जमिनीचे पट्टे नावावर करून दिले जातील, असे नाना पटोले म्हणाले होते. या संदर्भात व नवनिर्वाचित प्रांताध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची भेट जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेंद्र सावंत व युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी घेतली.
‘त्या’ धोरणाबाबत नाना पटोले यांचे मालवणचे युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी मानले आभार…
