*💫मालवण दि.०८-:* लेखकांनी सिंधुदुर्गातील साहित्यिकांवर सुंदर लेख लिहिले आहेतच. आता त्यांचे चरीत्र लिहिण्याचा संकल्प करा. लेखनातून साहित्य चळवळ समृद्ध करावी असे प्रतिपादन श्री. प्रमोद कोनकर यांनी येथे बोलताना केले को. म. सा. प. मालवण शाखेने नुकतेच प्रकाशित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकातील सोळा लेखकांचा तसेच या प्रकाशनासाठी काम केलेल्या सदस्यांचा ‘अक्षरगौरव सोहळा’ को. म. सा. प. सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. मंगेश म्हसके यांच्या अध्यक्षतेखाली कांदळगाव येथे पार पडला यावेळी को. म. सा. प. केंद्रीय सदस्य श्री. रुजारिओ पिंटो, कोकण मिडियाचे श्री. प्रमोद कोनकर, उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, श्री. रविंद्र वराडकर, श्री. माधव गावकर, श्री. रामचंद्र वालावलकर, उमेश कोदे , श्री. राजेंद्र मसुरकर, को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. मंदार सांबारी यांच्या स्वरचित इशस्तवनाने झाली. श्री. माधव गावकर यांनी सर्वांचे स्वागत केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सहभागी सोळा लेखकांचा “सिंधुसाहित्य सरिताने मला काय दिले?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व सोळा लेखकांना को.म.सा.प. मालवणच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र मसुरकर श्री. रामचंद्र आंगणे, श्री. माधव गावकर, श्री. रामचंद्र वालावलकर यांचीही समयोचित भाषणे झालीं यावेळी सिंधुसाहित्य सरिता या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे (पुनर्मुद्रण) प्रकाशन जिल्हा अध्यक्ष श्री. मंगेश म्हस्के, सत्वश्री प्रकाशनचे प्रकाशक श्री. प्रमोद कोनकर, श्री.सुरेश ठाकूर व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अक्षरगौरव कार्यक्रमाचे संयोजन सौ. अर्चना कोदे व कोमसाप सदस्यांनी केले. सूत्रसंचलन श्री. गुरुनाथ ताम्हणकर केले व आभार सौ. मधुरा माणगावकर यांनी मानले.
“साहित्यिकांचे चरित्र लिहिण्याचे प्रयत्न करा”- प्रकाशक प्रमोद कोनकर….
