*💫वैभववाडी दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ 8 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांच्या उपस्थित करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष याप्रमाणे कक्ष स्थापन करून नियोजन करण्यात आलेले आहे. 8 फेब्रुवारी ते दिनांक 12 फेब्रुवारी या कालावधीत वैभववाडी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका असे एकूण 380 कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. सोमवारी लसीकरणाचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्री. पवार यांना लस देऊन करण्यात आला. तरी सदरची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून पहिल्या टप्प्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ….
