Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-;* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 712 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 843 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 93 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

सीएस डॉ चव्हाण यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी….

*💫सिंधुदुर्गनगरी दि ०८-:* आपल्या कार्यालयातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांना आज येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकारी वकील स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात पाण्याविणा मोठे हाल..

२०० कोटी शिल्लक निधितुन सावंतवाडीची गैरसोय दूर करावी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.०८-:* सद्य स्थितीत सावंतवाडी तालुक्यात पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, अनेक गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. सद्य स्थितीत पाठबंधारे विभागाजवळ २०० कोटी रुपये जमा असून, ही रक्कम तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील…

Read Full News

मालवणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा सरमळकर यांचे निधन…

गोवा येथे उपचारा दरम्यान घेतला अखेरचा श्वास;सौ सरमळकर यांच्या निधनाने मालवणसह उभादांडा या माहेर गावात व्यक्त होतोय शोक मालवण दि प्रतिनिधी मालवणच्या माजी नगराध्यक्षा आणि मालवण लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. सुरेखा राजन सरमळकर यांचे आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यू समयी त्या ६२ वर्षाच्या…

Read Full News

आर्किटेक्चरच्या प्लाननंतर ठरणार भूमिका…

कणकवली प्राथमिक शाळा क्र ३ वाद जिल्हाधिकारी बैठकीत निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती *💫कणकवली दि.८-:* कणकवली प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतरांबद्दल नगररचना विभागाचे आर्किटेक्चर येवून प्लान पाहणार आहेत. हा प्लान तयार झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थान,पालक,आजी-माजी विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,असा निर्णय जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या…

Read Full News

आरोंदा चेक पोस्टवर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

५१ हजारांच्या गोवा बनावट दारूसह इंडिका कार जप्त *💫सावंतवाडी दि.०८-:* आरोंदा चेक पोस्ट येथे काल रात्री नाका-बंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना इंडिका कार वर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५१ हजार ची गोवा बनावटीची दारू तसेच इंडिका कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात…

Read Full News

उपचारादरम्यान अशोक कोरगावकर यांची प्राणज्योत मालवली…

*💫सावंतवाडी दि.०८-:* माठेवाडा येथील गॅरेज व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते अशोक कोरगावकर यांचे आज दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा येथील रेडकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Read Full News

नियम मोडून हॉटेल, बियर शॉपी सुरुच…

बुधवारी रात्री ८ नंतर सुरु होती हॉटेल;सावंतवाडी पोलिसांचा दोन व्यावसायिकावर गुन्हा दाखल सावंतवाडी-: राज्यात वाढता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवीन नियमानुसार रात्री आठ नंतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देत संचारबंदी लागू केली असताना देखील, काल शहरात रात्री ८ नंतर देखील काही हॉटेल सुरू होती. या हॉटेल व्यवसायिकांवर पोलिसांनी कारवाई केली असून, दोन…

Read Full News

गोवा येथे शनिवारी होणाऱ्या नाटा परिक्षेसाठी परवानगी…

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिल्याचे प्रेमानंद देसाई यांची माहिती *💫दोडामार्ग दि०८ सुमित दळवी-:* शनिवारी गोवा येथे होणा-या नाटा च्या परीक्षार्थींना गोवा कींवा अन्य ठिकाणच्या परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी तसेच अन्य प्रकारच्या सर्व परिक्षांना मा श्रीमती मंजू लक्ष्मी,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी व्हाल्ट टिकीट दाखवून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी श्री प्रेमानंद देसाई अध्यक्ष सरपंच संघटना…

Read Full News

मालवण साबाचे कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या.

माळगाव साळकरवाडी येथील काजूच्या झाडाला लावला गळफास : पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद *💫मालवण दि.०७-:* मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मयुरेश्वर चंद्रकांत भागानगरे (वय २४, राहणार सोलापूर) याने बुधवारी दुपारी माळगाव साळकरवाडी येथील काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे….

Read Full News

You cannot copy content of this page