जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिल्याचे प्रेमानंद देसाई यांची माहिती
*💫दोडामार्ग दि०८ सुमित दळवी-:* शनिवारी गोवा येथे होणा-या नाटा च्या परीक्षार्थींना गोवा कींवा अन्य ठिकाणच्या परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी तसेच अन्य प्रकारच्या सर्व परिक्षांना मा श्रीमती मंजू लक्ष्मी,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी व्हाल्ट टिकीट दाखवून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी श्री प्रेमानंद देसाई अध्यक्ष सरपंच संघटना सिंधुदुर्ग यांनी मा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी नाटा व समकक्ष सर्व परिक्षांना प्रवासासाठी परवानगी दिली आहे.जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयावर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
