*💫सावंतवाडी दि.०८-:* माठेवाडा येथील गॅरेज व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते अशोक कोरगावकर यांचे आज दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा येथील रेडकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
उपचारादरम्यान अशोक कोरगावकर यांची प्राणज्योत मालवली…
