५१ हजारांच्या गोवा बनावट दारूसह इंडिका कार जप्त
*💫सावंतवाडी दि.०८-:* आरोंदा चेक पोस्ट येथे काल रात्री नाका-बंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना इंडिका कार वर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५१ हजार ची गोवा बनावटीची दारू तसेच इंडिका कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे.
