कणकवली प्राथमिक शाळा क्र ३ वाद जिल्हाधिकारी बैठकीत निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
*💫कणकवली दि.८-:* कणकवली प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतरांबद्दल नगररचना विभागाचे आर्किटेक्चर येवून प्लान पाहणार आहेत. हा प्लान तयार झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थान,पालक,आजी-माजी विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,असा निर्णय जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या समवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली येथील जिल्हाधिकारी दालनात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ नितेश राणे, आ वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, नगरसेवक सुशांत नाईक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थानचे श्री कामत,पालक उपस्थित होते.
