सावंतवाडी तालुक्यात पाण्याविणा मोठे हाल..

२०० कोटी शिल्लक निधितुन सावंतवाडीची गैरसोय दूर करावी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.०८-:* सद्य स्थितीत सावंतवाडी तालुक्यात पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, अनेक गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. सद्य स्थितीत पाठबंधारे विभागाजवळ २०० कोटी रुपये जमा असून, ही रक्कम तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कमी पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी खर्च करण्यात यावी अशी मागणी श्री. देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जि. प. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडे केली आहे.

You cannot copy content of this page