Headlines

Global Maharashtra Breaking News

महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा हायस्कूल वार्षिक पारितोषिक वितरण ३० डिसेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित, महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. सदरील कार्यक्रम संदीप परब( संस्थापक जीवन आनंद संस्था ,कुडाळ)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दत्ता कवठणकर (उद्योजक कवठणी) तर प्रमुख अतिथी म्हणून…

Read More

“गद्दारांना क्षमा नाही”…

सालईवाडा प्रभाग क्र. ८ मधील ‘तो’बॅनर ठरला लक्षवेधी: शहरात देखील जोरदार चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२५ प्रसन्न गोंदावळे -: सावंतवाडी शहरातील सालईवाडा प्रभाग क्रमांक ८ येथे लावण्यात आलेला “गद्दारांना क्षमा नाही” असा मजकूर असलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावला, याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका…

Read More

निवृत्त शिक्षकांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा…

निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची गटविकास अधिकाऱ्यांजवळ निवेदनाद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: निवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्यावतीने मंगळवार २३ डिसेंबर रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात असे नमूद करण्यात आले की, ३० जूनच्या वेतनवाढीचा फरक याच महिन्यात अदा करण्यात यावा. तसेच निवृत्तीनंतर…

Read More

आरोपांनंतर थेट भेट..

आम. निलेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट:राजकीय वर्तुळात मोठी खळबळ… मुंबई : नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी असल्यासारखे वागत असल्याचे चित्र होते. मात्र आज मुंबईतील रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी…

Read More

निरवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे अमेय पै यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२४-: श्री कुलदेवता कला क्रिडा मंडळ निरवडे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज उद्योजक तथा भाजपा कार्यकर्ते अमेय पै यांच्या हस्ते पार पडले. या मंडळाने सलग तिसऱ्या वर्षी या भव्य स्पर्धैचे यशस्वी आयोजन केले. यातील विजेत्याला भाजपा चे नेमळे माजी सरपंच पुरस्कृत रु. १०००० व चषक तर उपविजेत्याला भाजपा कार्यकर्ते विक्रांत सावंत पुरस्कृत रु….

Read More

राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कॅडेटची निवड…

⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या केरळ ट्रेकसाठी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूलचा एनसीसी कॅडेट कार्पोरल प्रज्वल कविता विकास पाटोळे याची निवड झाली आहे. प्रज्वल कविता विकास पाटोळे हा केरळमधील कोलम, तिरुवनंतपुरम येथे दाखल झाला असून पुढील दहा दिवस हा ट्रेक चालणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी…

Read More

वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संदेश…

वेंगुर्लाभारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीचा शुभारंभ वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ…

Read More

ओझर विद्या मंदिर चे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबर रोजी…

⚡मालवण ता.२४-:मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव, तालुका- मालवण या माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २. ३० वाजता रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.शोभा संजय पेडणेकर व उद्घाटक म्हणून माजी मुख्याध्यापिका…

Read More

कांदळगाव येथे २६ जानेवारी रोजी “सिंधुदुर्ग श्री” स्पर्धा…

⚡मालवण ता.२४-:बेस्ट शिव- हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमान व्यायामशाळा, कांदळगाव, तालुका मालवण, यांच्यावतीने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेतली जाणारी व मानाची समजली जाणारी ” सिंधुदुर्ग श्री ” ही स्पर्धा यावर्षी कांदळगाव येथे २६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची सुरुवात कांदळगावचे सुपुत्र व बेस्ट…

Read More

सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी) यांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना ॲड. निरवडेकर भावूक झाले होते. ते म्हणाले,…

Read More
You cannot copy content of this page