भाजपा नेते श्री. विशाल परब व सौ. वेदिका परब यांचीही उपस्थिती..
⚡वेंगुर्ला ता.१९-: हिंदू धर्माभिमानी यांच्यावतीने आज गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेंगुर्ला शहरात ढोल-ताशे, सनईच्या मधुर वाद्यात, शंखनाद करीत काढण्यात आलेली स्वागतयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शवित यशस्वी केली. तर पारंपारिक वेशभूषा, लेझिम आणि समईनृत्य लक्षवेधी ठरले. वेंगुर्ला शहरातील वातावरण मंगलमय व चैतन्यमय बनले होते. यावेळी भाजपा नेते विशाल परब व वेदिका परब यांनी या स्वागतयात्रेत सहभागी होत नववर्षाचे स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे वेंगुर्ला येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींनी यावर्षीही मराठी नविन वर्षाच्या स्वागतासाठी गुरूवारी सायंकाळी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्वागतयात्रेच्या प्रारंभी नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगराई नष्ट होवोत यासाठी वेंगुर्ला ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेऊन सांगणे करण्यात आले. त्यानंतर तुतारी वाजवून व वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते उदघाटन करून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा नाका, दाभोली नाका, वेंगुर्ला मुख्य बाजारपेठ, गाडीअड्डा, मारुती मंदिर स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे आल्यानंतर यात्रेची सांगता झाली. या स्वागतयात्रेत पौराणिक आणि काल्पनिक वेशभूषा केलेली लहान मुले, रविंद्र पणशीकर यांनी केलेली शंख फुखणा-या कृष्णाची वेशभूषा, चांदेरकर महाराज यांचा वारकरी परिवार, मठ येथील विद्याथ्र्यांचे लेझिम पथक, तुळस येथील महिलांचे समईनृत्य यांच्यासह पारंपारिक वेशातील स्त्री पुरूष सहभागी झाले होते. दरम्यान सर्वच मुख्य चौक, बाजारपेठ येथे लेझिम आणि समई नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळविली.भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी च्या गरजनानी शहर एरिया गजबजून गेला होता. या नववर्ष स्वागत यात्रेत श्री देव रामेश्वर देवस्थानचे रवींद्र परब, दाजी परब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, हिंदू धर्माभिमानी गिरीश फाटक, बाबुराव खवणेकर, अरुण गोगटे, नित्यानंद आठलेकर, शिवराम आरोलकर, युवराज ठाकूर, विनय गरगटे, अभिषेक वेंगुर्लेकर, अमित नाईक, गुरुप्रसाद खानोलकर, राजन केरकर, रमेश नार्वेकर, जयराम वायंगणकर, श्री. शिरसाट, दाजी नाईक, सौ. नाईक, अजय गडेकर, प्रथमेश गुरव, संजय पुनाळेकर, शैलेश नार्वेकर, तुळस जि. प. सदस्या सुजाता पडवळ, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शिवसेनेचे सत्यवान साटेलकर, वेताळ प्रतिष्ठानचे डॉ. सचिन परूळकर, भाजपा युवामोर्चाचे प्रा. हेमंत गावडे, साक्षी वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल – साईप्रसाद नाईक, साई भोई, साईप्रसाद नाईक, भाजपच्या वृंदा गवंडळकर, नगरसेवक रवी शिरसाट, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, प्रशांत आपटे,युवराज जाधव, सचिन शेट्ये व अन्य, नगरसेविका रिया केरकर, आकांक्षा परब, गौरी मराठे, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, सुमन निकम, समिधा रेडकर, गौरी माईणकर, काजल कुबल व अन्य, भाजपा महिला शहरअध्यक्ष श्रेया मयेकर, उद्योजिका सीमा नाईक, रसिका मठकर, अनुसया रेडकर, समीक्षा डुबळे, मंजुषा आरोलकर, माजी नगरसेविका कृपा मोंडकर, सर्पमित्र महेश राऊळ, संतोष कासले तसेच शहरातील तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
