Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ हिंदू कॉलनी येथे विद्युत पोलवर झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित…

कुडाळ : काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळ व पावसामुळे कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिर येथे विद्युत पोलवर झाड कोसळले. काल (शनिवार) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार वादळ व पावसास सुरुवात झाली. दुपारपासून तर कुडाळ तालुक्यात वादळाचा वेग।अतिशय वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड चालू झाली आहे. कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिर येथे विद्युत पोलवर…

Read Full News

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 40 घरांचे नुकसान…

वैभववाडी तालुक्यास सर्वाधित फटका… *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे…

Read Full News

*मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे पावलू ट्रॅव्हल्स ला अपघात

एक जण ठार झाल्याचे वृत्त *💫ओरोस दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे पावलू ट्रॅव्हल्स ला भीषण अपघात झाला असून, या अपघातात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. परंतु याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

Read Full News

*मुसळधार पावसाचा सावंतवाडी नगरपालिकेला तडाखा

बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे छप्पर कोसळले* *💫सावंतवाडी दि.१६-:* नगरपालिकेचे बॅरिस्टर नाथ पै ला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, या सभागृहाचे छत कोसळून खाली पडले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टीवर धडकले ल्या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सावंतवाडी शहराला बसला आहे.

Read Full News

*आंबोलीतील दरड कोसळली

अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा *💫आंबोली दि.१६-:* काल रात्री पासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळली असून, काही ठिकाणी झाडे देखील कोसळून पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Read Full News

*चक्रीवादळाचा मालवणला तडाखा

*अनेक भागात झाडाची पडझड* मालवण दि प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने आज मालवण तालुक्याच्या किनारपट्टी वर तडाखा देण्यास सुरुवात केली असून पहाटे पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे रात्री पासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने आता जोरदार बरसने सुरू केले आहे देवबाग येथे माडाची झाडे मोडून पडली असून दोन वीज…

Read Full News

पिंगुळी येथील राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे निधन…

पिंगुळीसह भक्त परिवारात व्यक्त होत आहे हळहळ *💫कुडाळ दि.१६-:* पिंगुळी येथील राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी काल शनिवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंगुळी गावासह संपूर्ण भक्त परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचे…

Read Full News

टक्केवारीवर जगणारा म्हणून रूपेश राऊळ यांचा चेहरा तालुक्यात प्रसिद्ध

भाजपच्या अजय गोंदावळे यांची टिका *💫सावंतवाडी दि.१५-:* टक्केवारीवर जगणाऱ्या सेना तालुका प्रमुखांचा चेहरा तालुक्यात प्रसिद्ध असून, ज्यांना स्वतःच्या गावासह शेजारील मळगाव गावातील ग्रामपंचायत ज्यांना वाचवता आली नाही. त्यांच्यावर काय बोलणार असा उपरोधिक टोला भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी तालुक्यात दर दिवशी १५ – २० जणांच्या मृत्यूची जबाबदारी रुपेश राऊळ घेणार…

Read Full News

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा प्रभाव

समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटा किनाऱ्याच्या दिशेने;नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मच्छिमार सज्ज मालवण दि प्रतिनिधी तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव आता मालवणसह सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर जाणवू लागला असून आज दुपारी समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटांनी किनाऱ्याच्या दिशेने धाव घेतल्याने मच्छिमारानी आपल्या नौका सुरक्षित स्थळी हलविल्याच शिवाय किनाऱ्यावर इतस्ततः पडलेल्या मच्छिमारी साहित्याची बांधाबांध करीत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या एकूणच मालवण तालुक्यातील…

Read Full News

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण तात्पुरत्या कालावधीसाठी बंद

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:*  तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे.  वादळाचे परिणाम आणि दाहकता पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.  वादळाची परिस्थिती निवळल्यनंतर मंगळवार पासून लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयन्त राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  महेश खलिपे यानी दिली आहे….

Read Full News

You cannot copy content of this page