पिंगुळीसह भक्त परिवारात व्यक्त होत आहे हळहळ
*💫कुडाळ दि.१६-:* पिंगुळी येथील राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी काल शनिवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंगुळी गावासह संपूर्ण भक्त परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचे पुतणे होत. प. पू राऊळ महाराज मठाचे ते मठाधिपती होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, तीन भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
