Headlines

Global Maharashtra Breaking News

जेल क्वारंटाईन सेंटरमधून आरोपी फरार

सावंतवाडी आय टी आय सेंटरमधील घटना;खिडकीला चादर बांधून केले पलायन *सावंतवाडी-:* कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावंतवाडी आय टी आय येथे तयार करण्यात आलेल्या जेल क्वांरनटाईन सेंटर मधुन आज सकाळी सहाच्या सुमारास एक आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. खिडकीला चादर बांधून त्याने पळ काढला आहे. याबाबत जेल प्रशासनाकडून सावंतवाडी पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली असून,…

Read Full News

विनायक राणेंचे आ.नितेश राणेंनी केले सांत्वन

काही दिवसांपूर्वी जेष्ठ बंधु किशोर राणे यांचे झाले होते निधन *💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे यांचे जेष्ठ बंधू स्व. किशोर राणे यांचे निधन काही दिवसांपूर्वी झाले होते. त्यांच्या कुटुंबाची आज आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन करत त्यांना धीर दिला. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष सौ संध्या तेरसे, कुडाळ…

Read Full News

मुंबईत राज्यपालांचे कार्यालय राहिलेले नाही भाजपाचे झालेय

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जहरी टिका *💫देवगड दि.२३-:* आमदारांच्या नियुक्तीवरून राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर जहरी टीका केली आहे. मुंबईत राज्यपालांचं कार्यालय राहिलं नसून ते भाजप कार्यालय झालं आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. ‘मुंबईचं गव्हर्नर ऑफिस हे भाजपचं कार्यालय झालं…

Read Full News

*दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रीय दर्जाचे नर्सिंग कॉलेज उभारा

*कॉंग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा धाउसकर यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *💫दोडामार्ग दि.२३-:* सध्या आरोग्यक्षेत्राची गरज ही कुशल कामगार आहेत. दोडामार्ग तालुका हा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यांना जोडणारा जवळचा तालुका आहे शिवाय सध्या तेलंगणा येथील गाड्याही या मार्गे येत असतात. हे पाहता दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रीय दर्जाचे नर्सिँग कॉलेज उभारल्यास विद्यार्थी संख्या आणि त्यांना…

Read Full News

मच्छिमार, बाग़ायतदार, शेतकऱ्यांना भरीव मदत देणार

कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे आश्वासन *💫देवगड दि.२३-:* ताेक्ते चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामधील नुकसानग्रस्त मच्छिमार, बागायतदार, शेतकरी व इतर नुकसानग्रस्ताना शासनाकडून मोठ्या प्रमाणात भरीव मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी देवगडमध्ये चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करून मच्छिमारांच्या व्यथा…

Read Full News

तौक्ते बाधिताना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार

मनसे नेते नितिन सरदेसाई यांचे आश्वासन *💫देवगड दि.२३-:* तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या देवगड तालुक्यातील मच्छिमारांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे, असे माजी आमदार व मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगीतले. .देवगड तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस शिरीष सावंत, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पाहणी केली….

Read Full News

पाडलोसमध्ये कालव्याचा भराव कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान…

भरपाई देऊन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी *💫बांदा दि.२३-:* तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचे काम पाडलोसमध्ये धोकादायक पध्दतीने सुरू आहे. कालव्याच्या मातीचा भराव कोसळणार असल्याने त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकरी राजू माधव यांनी ठेकेदाराकडे केली हाेती. परंतु ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कालव्याचा भाग कोसळला अन् शेतातील माती वाहून गेल्याने आपले मोठे नुकसान झाले आहे. याला…

Read Full News

वैभववाडी तालुक्यात पुन्हा पाऊस पडला…

तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी_ *💫वैभववाडी दि.२३-:* वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तौक्ते वादळा नंतर अवकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.रविवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजेरी लावली.अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतीची कामे रखडली होती.गेले दोन…

Read Full News

दत्ता सामंत यांच्याकडून कोरोना नियंत्रणासाठी मदत सुरुच

कुंभारमाठ येथील कोविड सेंटरला दिला एक जंबो सिलिंडर व दोन ऑक्सीजन कॉन्स्ट्रेक्टर *💫मालवण दि.२३-:* मालवणचे उद्योजक तथा भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा कोरोना काळात रुग्णांसाठी मदतकार्य सुरूच ठेवले असून श्री सामंत यांनी आज कुंभारमाठ येथील कोव्हीड सेंटरला एक जम्बो सिलिंडर, आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर दिले. मालवणसह जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे….

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६६ रूग्ण सापडले

शहरात २६ तर ग्रामीणात ४० *💫सावंतवाडी दि.२३-:* तालुक्यात आज ६६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २६ तर ग्रामीण भागात ४० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जूनाबाझार ३, न्यू गरड १, न्यू लोकमान्य सो. १, बाहेरचा वाडा ३, सर्वोदय नगर १, वैश्यवाडा १, भटवाडी ९,…

Read Full News

You cannot copy content of this page