Headlines

गुरुनाथ तिरपणकर यांची मीडिया समन्वयकपदी नियुक्ती

बांदा/प्रतिनिधी
मूळ कणकवली येथील व सध्या बदलापूर येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार, ‘आवाज कोकणचा’ या साप्ताहिकाचे उपसंपादक तसेच जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांची राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संघटनच्या ठाणे जिल्हा मीडिया समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तिरपणकर हे मुक्त पत्रकारितेसह विविध वृत्तपत्र समूहांमध्ये पत्रकार व उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. मुंबई तसेच कोकणातील नागरिकांसाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक कार्याची आवड, तळमळ, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, संघटन कौशल्य आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांची ही नियुक्ती झाल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. मितभाषी आणि मनमिळावू स्वभावामुळे तिरपणकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत.
विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जबाबदारी सांभाळताना आता त्यांच्यावर आणखी एका संस्थेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो:-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page