*दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रीय दर्जाचे नर्सिंग कॉलेज उभारा

*कॉंग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा धाउसकर यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*

*💫दोडामार्ग दि.२३-:* सध्या आरोग्यक्षेत्राची गरज ही कुशल कामगार आहेत. दोडामार्ग तालुका हा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यांना जोडणारा जवळचा तालुका आहे शिवाय सध्या तेलंगणा येथील गाड्याही या मार्गे येत असतात. हे पाहता दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रीय दर्जाचे नर्सिँग कॉलेज उभारल्यास विद्यार्थी संख्या आणि त्यांना जवळील मोठ्या शहरांत नोकरी उपलब्ध होऊ शकते त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रीय दर्जाचे नर्सिँग कॉलेज उभारावे अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा धाउसकर यांनी केली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. शिवाय तौक्ते चक्रीवादळात दोडामार्गातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी याचेही दिले निवेदन त्यानी दिले

You cannot copy content of this page