मनसे नेते नितिन सरदेसाई यांचे आश्वासन
*💫देवगड दि.२३-:* तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या देवगड तालुक्यातील मच्छिमारांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे, असे माजी आमदार व मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगीतले. .देवगड तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस शिरीष सावंत, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पाहणी केली. यावेळी मच्छिमार जगन्नाथ काेयंडे, प्रदीप काेयंडे, द्विजकांत काेयंडे, चंद्रकांत पाळेकर, सचिन कदम, रघुनाथ काेयंडे, संजय बांदेकर आदी मच्छिमारांनी व्यथा आपली मांडली. नाैकांचे पुर्णत: नुकसान झाले त्यांना पुर्ण नुकसान भरपाई देवून आधार द्यावा, नुकसानग्रस्त नाैकांचे पुनर्वसन हाेणे गरजेचे आहे, त्यामुळे निकष बदलुन भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छिमारांनी केली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी तौक्ते चक्रीवादळाने मच्छिमारांचे माेठे नुकसान झाले असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र धावता दाैरा केला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणे गरजेचे हाेते. शासनाकडून तात्काळ मदत मिळणे गरजेचे असताना तीही मिळाली नाही, ही दुर्दैवी गाेष्ट आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या चक्रीवादळात नाैका मालकांचेही माेठे नुकसान झाले आहे. त्यांना सहानुभूतीने विचार करून मदत देणे गरजेचे आहे. मच्छिमार, शेतकरी, बागायतदार व इतर नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करेल, अशी ग्वाही यावेळी नितीन सरदेसाई यांनी दिली. यावेळी त्यांनी देवदुर्ग मच्मिार संस्थेला भेट देवून संस्थाचालक, मच्छिमार यांच्याशी संवाद साधला. यावेळी मनसे चित्रपट सेना राज्य चिटणीस संताेष शिंगाडे, तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपाध्यक्ष महेश नलावडे, सचिव जगदीश जाधव, अभिजीत तेली, सचिन राणे, परेश आडकर, अमित घाडी, प्रकाश वारीक आदी उपस्थित हाेते.
