पाडलोसमध्ये कालव्याचा भराव कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान…

भरपाई देऊन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

*💫बांदा दि.२३-:* तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचे काम पाडलोसमध्ये धोकादायक पध्दतीने सुरू आहे. कालव्याच्या मातीचा भराव कोसळणार असल्याने त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकरी राजू माधव यांनी ठेकेदाराकडे केली हाेती. परंतु ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कालव्याचा भाग कोसळला अन् शेतातील माती वाहून गेल्याने आपले मोठे नुकसान झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित ठेकेदार असून झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी आरोप राजू माधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page