कुंभारमाठ येथील कोविड सेंटरला दिला एक जंबो सिलिंडर व दोन ऑक्सीजन कॉन्स्ट्रेक्टर
*💫मालवण दि.२३-:* मालवणचे उद्योजक तथा भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा कोरोना काळात रुग्णांसाठी मदतकार्य सुरूच ठेवले असून श्री सामंत यांनी आज कुंभारमाठ येथील कोव्हीड सेंटरला एक जम्बो सिलिंडर, आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर दिले. मालवणसह जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी रुग्ण दगावत आहेत. रूग्णांचे हाल होऊ नयेत, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी उद्योजक तथा भाजप नेते दत्ता सामंत पुढे सरसावले आहेत. गेले अनेक दिवस दत्ता सामंत यांनी सेवेत वाहून घेतले आहे. औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांपर्यंत थेट पोहचून त्यांना धीर देण्याचे व त्यांना बळ देण्याचे काम सामंत करत आहेत. ऑक्सिजन रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी एक जम्बो सिलेंडर आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर मशीन दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून उपल्बध केले आहेत. आज कुंभारमाठ येथील कोव्हीड सेंटरला हे साहित्य अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, बाळा सामंत, बाबू धुरी, डॉ. कपिल मेस्त्री, यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वत्र वीज पुरवठा खंडित झाला आहे. कोव्हीड सेंटर येथेही वीज नसल्याने रुग्णांना अडचण होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या वतीजे जनरेटर बसविण्यात आला. मात्र, जनरेटर ज्या कालावधीसाठी घेतला आहे, तो कालावधी संपत आहे. त्यामुळे जनरेटर धारकाने जनरेटर घेऊन गेल्यास पुन्हा रुग्णांची अडचण होऊ शकते. जर प्रशासनाने मला परवानगी दिल्यास मी स्वखर्चाने दर्जेदार जनरेटर उपलब्ध करू असेही दत्ता सामंत यांनी जाहीर केले.
