Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 86 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 43.05 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक वैभववाडी तालुक्यात 86 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2093.538 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 14(2026), सावंतवाडी -29(2250.10), वेंगुर्ला…

Read Full News

जिल्हा कलाध्यापक संघटनेचा कलाशिक्षक रणजित दळवी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

*💫कणकवली दि.१८-:* कळसुली हाय.येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक रणजित अंकुश दळवी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबियांना यावे शिवाय आपल्या सहकारी व्यक्तीच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग‌‌‌च्यावतीने जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांनी मोठ्या संख्येने संघटनेच्या…

Read Full News

कणकवली शिवाजीनगर येथे रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने नागरिकांना होतो त्रास

सुसंस्कृत नागरिकांचे हे कृत्य अयोग्य: सुहास वरुणकर *💫कणकवली दि.१८-:* कणकवली येथील रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर रस्त्यावर हॉटेलसमोर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कणकवली सारख्या शहरातील शिवाजीनगर या सुसंस्कृत वस्ती असलेल्या भागातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असतील तर त्याला काय म्हणावे ?असा सवाल सुप्रसिद्ध दिग्दर्शक तथा अभिनेते आणि कणकवली शिवाजीनगर येथील रहिवाशी…

Read Full News

भाजप – शिवसेनेचे कार्यकर्ते आले आमने सामने

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद टळला *💫दोडामार्ग दि.१८ सुमीत दळवी-:* तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, यावरून भाजप – शिवसेनेने आज दोडामार्ग गांधी चौक येथे आमने सामने येण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला

Read Full News

चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररूप,

घरावर भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू *💫मुंबई दि.१८-:* मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता हा अपघात झाला. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. सततच्या पावसामुळे एक झाड…

Read Full News

*कोलगाव माध्यमिक विद्यालय मधून तनुजा राऊळ ७९.६० टक्के गुणांसह प्रथम

तालुक्यातील कोलगाव माध्यमिक विद्यालयचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून, तनुजा दत्ता राऊळ हिने ७९.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक प्राप्ती ठाकर हिने ७५.६० टक्के आणि तृतीय क्रमांक यशवंत सावंत ७२.०० टक्के गुणांसह पटकावला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Read Full News

अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल १०० टक्के

सृष्टी लक्ष्मण हांडेने मिळविले ५०० पैकी ५०० गुण *💫वैभववाडी दि.१७-:* दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेतील कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. या विद्यार्थीनीने एस.एस.सी परिक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच कु.पार्थ सचिन क्षीरसागर या विद्यार्थ्याने ४९७ गुण मिळवत ९९.४०% गुण…

Read Full News

आयडियल इंग्लिश स्कूलचे शंभर नंबरी यश

शाल्मली नानल प्रथम तर प्रियांका पारकर द्वितीय *💫कणकवली दि.१७-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चा निकाल १००% लागला असून एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी विशेष…

Read Full News

बांदा ते दोडामार्ग ‘औद्योगिक कॉरिडॉर’ करण्याचा विचार

रोजगारासंदर्भात सरपंच अक्रम खान यांनी वेधले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष *💫बांदा दि१७-:* गोव्यात रोजगारासाठी जाणारा तरुण वर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबावा यासाठी बांदा ते दोडामार्ग हा ‘औद्योगिक कॉरिडॉर’ करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. बांदा सरपंच अक्रम खान यांनी राणे यांनी दिल्ली येथे भेट घेत केंद्रीय मंत्रीपदी निवड…

Read Full News

दहावी निकालात मालवणातील सर्व १२०३ विद्यार्थी उत्तीर्ण

१०० टक्के निकाल *💫मालवण दि.१७-:* कोकण बोर्डाने शालेय मूल्यमापन अंतर्गत जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात मालवण तालुक्याने बाजी मारली असून सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी मालवण तालुक्यातून १२०३ विध्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात ६२६ मुलगे तर ५७७ मुलींचा समावेश आहे. अ शि दे टोपीवाला हायस्कूल, मालवण या प्रशालेमधून १३० विद्यार्थी परीक्षेस…

Read Full News

You cannot copy content of this page