चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररूप,

घरावर भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू

*💫मुंबई दि.१८-:* मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता हा अपघात झाला. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. सततच्या पावसामुळे एक झाड भिंतीवर पडले आणि मग भिंत कोसळली. यात १२ लोक ढिगाऱ्याखाली दबून जागीच ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. भिंतीचा ढिगारा बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. चेंबूरमध्ये आतापर्यंत 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

You cannot copy content of this page