सुसंस्कृत नागरिकांचे हे कृत्य अयोग्य: सुहास वरुणकर
*💫कणकवली दि.१८-:* कणकवली येथील रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर रस्त्यावर हॉटेलसमोर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कणकवली सारख्या शहरातील शिवाजीनगर या सुसंस्कृत वस्ती असलेल्या भागातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असतील तर त्याला काय म्हणावे ?असा सवाल सुप्रसिद्ध दिग्दर्शक तथा अभिनेते आणि कणकवली शिवाजीनगर येथील रहिवाशी सुहास वरुणकर यांनी केला आहे. सुहास वरुणकर म्हणतात. गेले काही महिने असाच कचरा वारंवार टाकलेला पाहिले आहे.शिवाजीनगरची वस्ती शहरात उत्तम विवेक विचार असलेल्या लोकांची म्हणून ओळखली जाते.कणकवली नगरपंचायत कचरा नेण्याची चांगली सेवा देत असताना हा आरोग्याला हानिकारक कचरा येथे लपून छपून टाकणारी माणसे ही आपल्या संस्कृतीमधील नसावीत असं वाटतंय.शिवाजीनगर रहिवाशी यांना आवाहनआहे कि येथे असा सोसायटीतला कचरा असा टाकताना आढळ्यास नीट नोंद घ्यावी. कचरा टाकणाऱ्याचा जाहीर सत्कार करूया असा उपरोधिक टोला लगावताना सुहास वरुणकर म्हणाले, कचरा टाकताना एका व्यक्तीला याची विचारणा केली मात्र त्यांनी उत्तर दिले ते हसण्यासारखे आहे.मी तिसऱ्या माजल्यावर राहतो.मला नगरपाचायत सफाई कामगार कधी येतात ते माहित नाही असे सांगितले .काही महिला भगिनी शिवाजी वमहाराज्यांच्या पुतळ्याच्या दिशेने पण येतात पण काही बंधू मोटरसायकल वरून कचरा टाकून जातात.आपल्या वास्तव्यापासून दूर कचरा टाकून त्याचा त्रास दुसऱ्यास देण्यात त्यांना धन्यता वाटते असे सुहास वरुणकर म्हणाले.कचरा नेण्याकरिता नगरपंचायत सक्षम असताना ही वेळच रहिवाशांवर का येते हे मोठे प्रश्न चिन्ह आहे असे सुहास वरुणकर म्हणाले.
