आयडियल इंग्लिश स्कूलचे शंभर नंबरी यश

शाल्मली नानल प्रथम तर प्रियांका पारकर द्वितीय

*💫कणकवली दि.१७-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चा निकाल १००% लागला असून एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी विशेष श्रेणीत २९ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत १५ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. स्कूलचे पाहिले ५ उत्तीर्ण विद्यार्थी खालीलप्रमाणे १) कु.शाल्मली मंदार नानल – ४९९/५०० (९९.८०) २) कु.प्रियांका आनंद पारकर ४८६/५०० (९७.२०) ३) कु.मंदार दिगंबर सावंत- ४८१/५०० (९६.२०) ४) कु.हर्षिता प्रमोद पवार – ४६३/५०० (९२.६० ) ५) कु. सादीया अफझलखान पठाण४५४/५०० (९०.८० ) स्कूलच्या कु.शाल्मली नानल हिने इंग्लिश विषयात १०० गुण प्राप्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत,कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे,सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शितल सावंत , सल्लागार डी. पी.तानावडे, स्कूलच्या मुख्याद्यापीका सौ.अर्चना शेखर देसाई, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page