दहावी निकालात मालवणातील सर्व १२०३ विद्यार्थी उत्तीर्ण

१०० टक्के निकाल

*💫मालवण दि.१७-:* कोकण बोर्डाने शालेय मूल्यमापन अंतर्गत जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात मालवण तालुक्याने बाजी मारली असून सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी मालवण तालुक्यातून १२०३ विध्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात ६२६ मुलगे तर ५७७ मुलींचा समावेश आहे. अ शि दे टोपीवाला हायस्कूल, मालवण या प्रशालेमधून १३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यातील ६१ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये उत्तीर्ण झाले असून ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेत प्रथम – मिलिंद उज्वल मुरवणे (५००), द्वितीय- संस्कृती सागर मिसाळ (४९७) व रिद्धी वसंत हडकर (४९७), तृतीय- श्रेया वैभव नाईक (४९१) यांनी यश मिळवले. या परिक्षेत दोन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक मिलिंद अवसरे व संस्था चालक यांनी अभिनंदन केले आहे. भंडारी ए सो हायस्कूल, मालवण या प्रशालेमधून ८८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यातील १२ विद्यार्थी विशेष प्राविण्यमध्ये उत्तीर्ण झाले असून ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. या प्रशालेत प्रथम- चैतन्य दत्ता चव्हाण (४४१+७), द्वितीय- मिताली अमित मयेकर (४३२), तृतीय- स्नेहल गणपत मोंडकर (४२१+ ३) यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर व इतर संस्था पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. एस एस कुडाळकर हायस्कुल, मालवण मालवण येथील डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेत प्रथम- लाजरी सतिश सरमळकर (७७.६०%), द्वितीय- जान्हवी प्रभाकर बोभाटे (७४%), तृतीय- आकाश मरळाप्पा मॅगेरी (७३.६०%). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व मुख्याध्यापिका सौ.एन.एन.साटलकर तसेच संस्थेचे अध्यक्ष विलास झाड, सेक्रेटरी भालचंद्र राऊत तसेच संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. श्री शांतादुर्गा हायस्कुल वडाचापाट या प्रशालेमधून ३० विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील १४ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. १०० टक्के निकाल लागला. प्रथम – अक्षता एकनाथ चव्हाण (४६३, ९२.६०%,) द्वितीय – कोमल सत्यवान पालव (४५४, ९०.८०%) तृतीय – कोमल संजय मांजरेकर (४५०,९०%). सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्थेचे अभिमन्यू कवठणकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक जे. एन. पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. प्रगत विद्यामंदीर, रामगड या प्रशालेमधून ४२ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील ११ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथम- प्राची धाकू मेस्त्री (९८.२०%), द्वितीय- अमिषा अनंत बाईत (९२.२०%), तृतीय- भक्ती शिवप्रसाद पराडकर (९१.६०%) यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक अ. म. वळंजू, संस्थेचे अध्यक्ष वा. स. प्रभुदेसाई, सचिव वि. म. मठकर, उपाध्यक्ष सु. रा. तळवडेकर, संस्था संचालक सुभाष धुरी तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. रोझरी इंग्लिश स्कुल, मालवण रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण च्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. या प्रशालेमधून ७४ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील ५२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेत प्रथम- श्याम शांतीलाल पटेल(९८%), द्वितीय- भूमिका विजय यादव(९७.८०%), तृतीय- सृष्टी संदीप सामंत(९६.२०%) यांनी यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक फादर. अल्विन गोन्साल्विस, माजी मुख्याध्यापक फादर मरिया दास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग या सर्वांनी अभिनंदन केले आहे. जय गणेश इंग्लिश स्कुल, मालवण या प्रशालेमधून ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील २२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथम – श्रेयस विजय कामत (९७.४०%), द्वितीय- तन्वी राहुल वझे (९६.८०%), तृतीय- कनक रवींद्र दळवी (९५.८०%) यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व संस्था चालक यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल, कट्टा मालवण या प्रशालेमध

You cannot copy content of this page