*💫सावंतवाडी दि.१७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात १८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात ज्युस्तीन नगर येथे २ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात कोलगाव २, नेमळे २, बांदा १, न्हावेली १, मळेवाड १, वेत्ये १, मडूरा १, तळवडे ५, मळगाव २, निरवडे २ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २६१ सक्रिय रुग्ण आहेत.
