Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ३, सावंतवाडी १, सालई वाडा १, जुना बाझार १, न्यू खासकिलवाडा १, तर ग्रामीण भागात वेर्ले १, माजगाव १, मळगाव…

Read Full News

निगुडेत पुरामुळे लाखोंचे नुकसान

*💫बांदा दि.२४-:* मुसळधार पावसामुळे निगुडे गावात पुराचे पाणी शिरले. पाण्याचा ओघ वाढल्याने निगुडे पाटीलवाडीतील अनेक घरांना फटका बसला. पहाटे सकाळी चार वाजता हळू पुराचे पाणी घरामध्ये शिरायला सुरुवात झाले. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. हा हा म्हणता संपूर्ण घरांमध्ये पाणी घुसले व लाखो रुपयांचे नुकसान झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू असून अद्याप नेमका…

Read Full News

बांदा बाजारपेठेत स्वच्छता मोहीम

नगराध्यक्ष संजू परब मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची कार्यतत्परता;बांदा सरपंच अक्रम खान यांनी वेधले होते लक्ष *💫बांदा दि.२३-:* बांदा बाजारपेठेत पुराच्या पाण्याने साचलेल्या कचऱ्याची बांदा सरपंच अक्रम खान यांनी लक्ष वेधल्यावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी कचरागाडी व पाण्याचा टॅंकर मागवून बाजारपेठ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बांदा येथे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर…

Read Full News

मस्कुलर डिस्ट्रॉफी आजारी असतानाही मिळविले यश

दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी यज्ञेश पोकळेचे सोनेरी यश *💫कणकवली दि२४-:* शैक्षणिक वर्ष सन 2020 /21 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्यातून 45 दिव्यांग विद्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले.मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रस्त असलेल्या यज्ञेश पोकळे याने 98.60% गुण मिळवून एस. एम.हायस्कूलमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही….

Read Full News

शेर्ले जुना कापईपूल दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

भातशेतीचे मोठे नुकसान *💫बांदा दि.२४-:* गुरूवारी मध्यरात्री तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शेर्ले कापईवाडीत व गावात पाणी शिरले होते. शनिवारी दुसऱ्या दिवशी जुना कापई पुलावर एक पुरुषभर पाणी होते. आलेल्या महापुरामुळे परिसरातील भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागच्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा दशक्रोशील झोडपले. तेरेखोल नदीच्या पाण्याने शेर्ले नदीला महापूर आला….

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४३ हजार ९३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निरुखे धरणासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे खासदार विनायक राऊत यांना पत्र;जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांची माहिती *💫कुडाळ दि.२४-:* महाराष्ट्र शासनाच्या सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाच्या आखणीमध्ये निरुखे धरणासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तशा प्रकारचे पत्र जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत यांना दिले आहे. त्यामुळे सदर…

Read Full News

काँक्रीट वाहुन गेल्याने खोक्रल पुल वाहतुकीस धोकादायक

ग्रामस्थांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा: देवेंद्र शेटकर *💫दोडामार्ग दि२४ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खोक्रल येथील दोन्ही पुलावरील काँक्रीट वाहुन गेल्याने हा पुल वाहतुकीस धोकादायक बनला आहे.हा पुल वाहतुकीस सुरळीत व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता मात्र त्या पाठपुराव्याकडे प्रशासन पुर्णपणे डोळेझाक करताना दिसत आहे. गेल्या तीनवर्षापासुन स्थानिक लोकांच्या…

Read Full News

पूजारी व भाविकांना आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वितरण

वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात उपक्रम *💫वेंगुर्ला दि.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरातील पूजा-यांना व भाविकांना आर्सेनिक अल्बम-३०या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर क्लबचे डॉ.संजिव…

Read Full News

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला शिवसेनेतर्फे २७ जुलै रोजी विविध कार्यक्रम

*💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता येथील साई मंगल कार्यालयात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तौक्ते चक्रीवादळामध्ये जीवाची बाजी लावत विद्युत पुरवठा सुरळीत करण्या-या महावितरण कंपनीच्या १०३ कर्मचा-यांचा तसेच कोविड-१९च्या कालावधीमध्ये सामाजिक बांधिलकी राखून काम करणा-या कोरोना योद्धांचा…

Read Full News

You cannot copy content of this page