भातशेतीचे मोठे नुकसान
*💫बांदा दि.२४-:* गुरूवारी मध्यरात्री तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शेर्ले कापईवाडीत व गावात पाणी शिरले होते. शनिवारी दुसऱ्या दिवशी जुना कापई पुलावर एक पुरुषभर पाणी होते. आलेल्या महापुरामुळे परिसरातील भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागच्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा दशक्रोशील झोडपले. तेरेखोल नदीच्या पाण्याने शेर्ले नदीला महापूर आला. शुक्रवारी पूर्ण दिवस रात्र असलेले पाणी काहीसे ओसरले तर कापईवाडी जुना पूल मात्र शनिवारीही पाण्याखाली होता. त्यामुळे परिसरातील भातशेतीचेही मोठे नुकसान झाले.
