मस्कुलर डिस्ट्रॉफी आजारी असतानाही मिळविले यश

दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी यज्ञेश पोकळेचे सोनेरी यश

*💫कणकवली दि२४-:* शैक्षणिक वर्ष सन 2020 /21 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्यातून 45 दिव्यांग विद्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले.मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रस्त असलेल्या यज्ञेश पोकळे याने 98.60% गुण मिळवून एस. एम.हायस्कूलमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही. व्हीलचेअरवर बसून हालचाल करावी लागते असे असतानाही त्याने त्या परिस्थितीवर मात करत मिळविलेले हे यश सोनेरी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कुमार यज्ञेश पोकळे (एस एम हायस्कूल कणकवली 98.60% प्रथम क्रमांक), मोहम्मद हूर मुकादम सेंट उर्सुला हायस्कूल कणकवली (77% द्वितीय क्रमांक),पूजा परब (कळसुली हायस्कूल कळसुली 73.20% तृतीय क्रमांक)यांनी यश संपादन केले आहे. यज्ञेश पोकळे याला पुढे जाऊन त्याला कॉमर्स साईटने शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंट बनायचे आहे. तर कोणाला चांगला अधिकारी बनायचे आहे अशी स्वप्न व महत्वकांक्षा उराशी बाळगून सर्व दिव्यांग विद्यार्थी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे .यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक,वर्गशिक्षक, मुलांचे पालक ,मुलांचे सहकारी व विशेषता सर्व शिक्षा अभियान पंचायत समिती कणकवली येथील कर्मचारी यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.कणकवली तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी व गट समन्वयक यांचेही त्यांना सहकार्य लाभले आहे.

You cannot copy content of this page