नगराध्यक्ष संजू परब मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची कार्यतत्परता;बांदा सरपंच अक्रम खान यांनी वेधले होते लक्ष
*💫बांदा दि.२३-:* बांदा बाजारपेठेत पुराच्या पाण्याने साचलेल्या कचऱ्याची बांदा सरपंच अक्रम खान यांनी लक्ष वेधल्यावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी कचरागाडी व पाण्याचा टॅंकर मागवून बाजारपेठ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बांदा येथे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पुराचे पाणी ओसरल्यावर पुराच्या पाण्याबरोबर विविध ठिकाणचा कचरा बाजारपेठेत साचून दुर्गंधी पसरलेली होती. याची दखल घेत बांदा सरपंच अक्रम खान यांनी तात्काळ सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांचे लक्ष वेधून कचरागाडी व पाण्याचा टॅंकर मागवून बाजारपेठ स्वच्छ केली. त्यामुळे अक्रम खान यांनी नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले आहेत
